33.7 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रऑक्सिजन घोटाळ्याचा ईडी करणार तपास

ऑक्सिजन घोटाळ्याचा ईडी करणार तपास

मुंबई : मुंबईत कोविड कालावधीत झालेल्या कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळ््याप्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑक्सिजन प्लँट प्रकरणी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता ईडीसुद्धा प्रकरणाचा तपास करणार आहे.

कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळ््याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या जवळचा समजला जाणारा व्यापारी रोमन छेडा याला अटक केली असून तो सध्या तुरुंगात आहे. छेडा आणि त्यांच्या कंपनीला पात्रता नसतानाही कंत्राट मिळाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बीएमसीला ६ कोटी रुपयांचा फटका बसला आणि फसवणूक झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी बीएमसीच्या अनेक अधिका-यांनी छेडा यांना मदत केल्याचा आरोप आहे.

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन प्लँट घोटाळ््याच्या संदर्भात नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास करत रोमिन छेडा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व प्रकरणात गैरप्रकार झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी रोमिन यांना अटक करत पुढील कारवाई सुरू केली. मुंबई आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असून छेडा यांच्या कंपनीच्या माध्यमातून काही शेल कंपनींनासुद्धा पैसे ट्रान्सफर केले गेले असल्याचे समोर आले आहे. त्याचाही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR