17.5 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअपक्ष आमदार शरद सोनवणे मुंबईला रवाना

अपक्ष आमदार शरद सोनवणे मुंबईला रवाना

नारायणगाव : प्रतिनिधी
जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांचा तब्बल ६ हजार ६६४ मतांनी विजय झाला आहे.
दरम्यान,जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे यांचा तब्बल ६ हजार ६६४ मतांनी विजय झाला आहे.

विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा पराभव होऊन ते तिस-या क्रमांकावर राहिले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना दुस-या क्रमांकाची मते पडली आहेत. सोनवणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सत्यशील शेरकर यांचा पराभव केला आहे.

शरद सोनवणे यांना ७३ हजार ३५५ मते पडली आहेत. भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार आशाताई बुचके यांना ९ हजार ४३५ एवढे मतदान झाले आहे. शरद सोनवणे २०१४ च्या निवडणुकीमध्ये मनसेचे एकमेव आमदार म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांनी त्यांचा पराभव केला होता. तर २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा शरद सोनवणे निवडून आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR