29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
HomeFeaturedमतदानाच्या टक्केवारीवर आक्षेप; इंडिया आघाडी राष्ट्रपतींना भेटणार

मतदानाच्या टक्केवारीवर आक्षेप; इंडिया आघाडी राष्ट्रपतींना भेटणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभर एकिकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उद्या (गुरूवारी) भेट घेणार आहे. इंडिया आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजांवर संशय आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे शष्टमंडळ थेट आता राष्ट्रपतींशी या विषयावर चर्चा करणार आहे.

मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरुन शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला.

दोन्ही टप्पे मिळून ६० टक्के सरासरी मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने कळवले. मात्र ११ दिवसांनी म्हणजेच ३० एप्रिलला ६६ टक्के मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली. याचाच अर्थ आधी आणि नंतर दिलेल्या आकडेवारीत ६ टक्क्यांचा फरक आहे. याआधीपर्यंत मतदानाच्या दुस-या दिवशी जी आकडेवारी मिळायची तीच अंतिम मानली जायची. पण यंदा ११ दिवसांनी सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे हा विलंब का लागला? याचे उत्तर विरोधक निवडणूक आयोगाकडे मागत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR