29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरमतदारयादीत नावे नसल्याने गैरसोय

मतदारयादीत नावे नसल्याने गैरसोय

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारासाठी दि ७ मे रोजी मतदान झाले. जिल्हा प्रशासनाकडून सर्व स्तरावर मतदार जनजागृती करुन मतदानासाठी मतदारांना प्रेरित करण्यात आले परंतु लातूर शहरातील अनेक मतदान केंद्रांवर जुन्य मतदान ओळखपत्र (अपडेट) अद्ययावत नसणे, यादीत नावे नसणे यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहण्याचे प्रकार घडले आहेत.

मतदान करावयास गेल्यानंतर केंद्रावर मतदार याद्यात अनेकांची नावे नसल्याचेही निदर्शनास आले.ज्यांनी आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत मतदान केले त्यांचीही नावे यादीत नसल्याचे दिसून आले. ज्यांची यादीत नावे आली आहेत त्यांचे पूर्ण नाव नसल्याचे दिसून आले. पूर्ण नाव नसल्यामुळे नावातील साम्य असल्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याबाबत काही मतदारांनी मोबाईलवर मतदान केंद्र शोधण्याचा प्रयत्न केला तर केंद्राचे स्थळ दुसरेच दाखवून दिले जात होते. वास्तवदर्शी मात्र मतदान दुसरीकडील केंद्रावरअसल्याचे दिसून आले. मतदारयादीत नाव शोधण्यासाठी दोन ते तीन मतदान केंद्रांवर नावाचा शोध घेण्यासाठी फिरावे लागल्याची तक्रार अनेकांनी केली. हा प्रकार खाडगाव रोड भागात प्रकर्षाने दिसून आला. जुन्या गाव भागातही असाच प्रकार झाल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी संबधित अधिका-यांकडे मतदारांनी तक्रार केली परंतु येणा-या निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नावे सामाविष्ठ करुन घ्या असे सांगण्यात आले.त्यांचे हे उत्तर ऐकून मतदान न करताच परत जावे लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR