29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरसंघ लोकसेवा आयोग(युपीएससी)परीक्षा २०२३ मध्ये लातूरची कन्या प्रतिक्षा काळे भारतात सर्वद्वितीय 

संघ लोकसेवा आयोग(युपीएससी)परीक्षा २०२३ मध्ये लातूरची कन्या प्रतिक्षा काळे भारतात सर्वद्वितीय 

लातूर : संघ लोकसेवा आयोग(युपीएससी) परीक्षा २०२३ मध्ये लातूरची कन्या प्रतिक्षा नानासाहेब काळे हिने घवघवीत यश मिळावले असून तीला ऑल इंडिया सेकंड रॅक मिळाला आहे. ती सध्या मेळघाट परतवाडा अमरावती विभाग येथे सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) या पदावर वर्ग-१ अधिकारी म्हणुन कार्यरत आहे.
शहरातील लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण झालेल्या प्रतिक्षा काळे हिचे माध्यमिक शिक्षण प्रकाशनगरमधील सरस्वती विद्यालयात झाले. ११ वी, १२ वी विज्ञान राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले. पुढे तीने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे (सीओईपी) येथे बी-टेकचे शिक्षण पुर्ण केले. प्रतिक्षाने संघ लोकसेवा आयोगाची प्री परीक्षा मे २०२३ तर मेन परीक्षा नोव्हेंबर/ डिसेंबर २०२३ मध्ये दिली होती. तिची मुलाखत २२ एप्रिल रोजी झाली. त्याचा निकाल ८ मे रोजी घोषीत करण्यात आला. त्यात प्रतिक्षा काळे ऑल इंडिया सेकंड रँक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR