नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जातनिहाय जनगणनेला महत्त्व देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत चेन्नईत व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण करून द्रमुकच्या प्रमुखांनी आपला हेतू जाहीर केला आहे.
या कार्यक्रमाला इंडिया आघाडीचे इतर महत्त्वाचे सहकारी पक्ष आणि त्यांचे नेते काँग्रेस, मुख्यमंत्री नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कार्यक्रमास बोलविले नाही. द्रमुक हा काँग्रेसचा सर्वांत मोठा विश्वासू मित्रपक्ष आहे. अलीकडच्या काळात अखिलेश यादवही काँग्रेसवर नाराज आहेत. विरोधकांची आघाडी इंडियातील सर्वांत मोठा पक्ष काँग्रेसही या कार्यक्रमाबाबत संभ्रमात होता. व्ही. पी. सिंह हे उत्तर प्रदेशातील होते. त्यामुळे फक्त अखिलेश यादव यांनाच बोलविण्याचे ठरले. जातीय जनगणनेला गती देण्यासाठी ही राजकीय खेळी महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसनेही ९० च्या दशकापासूनची आपली जुनी भूमिका बदलून आता जातनिहाय जनगणनेचे जोरदार समर्थन करत आहे.