25.8 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeक्रीडाभारत-कॅनडा सामना पावसामुळे रद्द

भारत-कॅनडा सामना पावसामुळे रद्द

फ्लोरिडा : भारत-कॅनडा यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले आणि टीम इंडिया ७ गुणांसह सुपर ८ मध्ये पोहोचली. कॅनडाने ४ सामन्यांत ३ गुणांसह स्पर्धेचा निरोप घेतला.

अ गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतर भारतीय संघ कॅनडाविरुद्ध खेळणार होता. फ्लोरिडा येथे हा सामना सुरू होणार होता. इथे काल अमेरिका व आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील पॅक अप निश्चित झाले. आजही भारत-कॅनडा लढतीवर पावसाचे सावट होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत खेळपट्टीवरील कव्हर्स काढले गेले नव्हते, परंतु पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. ८ वाजता खेळपट्टीची पुन्हा पाहणी केली जाणार असल्याने नाणेफेकीला विलंब झाला. सामनाधिकारी व अम्पायर यांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर नापसंती दर्शवली आणि ९ वाजता पुन्हा पाहणी केली गेली आणि हा सामना रद्द झाल्याची घोषणा झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR