40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्यातंत्रज्ञान क्षेत्रात भारत पुढे, मात्र कोट्यवधी लोकांकडे नाही कनेक्टिव्हिटी...

तंत्रज्ञान क्षेत्रात भारत पुढे, मात्र कोट्यवधी लोकांकडे नाही कनेक्टिव्हिटी…

नवी दिल्ली : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत सध्या वेगाने प्रगती करत आहे. यामध्ये इंटरनेटचा मोठा वाटा आहे. देशातील ग्रामीण भागातही सध्या इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. मात्र, अद्याप कोट्यवधी लोक सक्रियपणे इंटरनेट वापरत नसल्याचे एका अहवालात समोर आले.

इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि कंटार या संस्थेने मिळून एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सुमारे ६६.५ कोटी लोक आजही नियमित किंवा सक्रियपणे इंटरनेट वापरत नाहीत. अर्थात, इंटरनेट यूजर्सची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले.

२०२१ साली देशातील सुमारे ७६.२ कोटी लोक इंटरनेटपासून वंचित होते. तर २०२२ साली ही संख्या कमी होऊन ७१.४ कोटी झाली. २०२३ सालच्या आकडेवारीनुसार ही संख्या ६६.५ कोटी झाली आहे. दरवर्षी सुमारे ३-४ टक्क्यांनी ही संख्या कमी होत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

भारताच्या ग्रामीण भागातील जवळपास निम्मे लोक इंटरनेट वापरत नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. इंटरनेट न वापरणा-या 23 टक्के लोकांनी आपल्याला ते समजतच नाही, असे म्हटले आहे.

ग्रामीण भागात वाढले इंटरनेट यूजर्स
दरम्यान, देशातील ग्रामीण भागातील इंटरनेट यूजर्सची संख्या वाढत असल्याचे या अहवालात सांगितले. देशात सध्या ८०.२ कोटी सक्रिय इंटरनेट यूजर्स आहेत. त्यातील ४४.२ कोटी, म्हणजेच निम्म्याहून अधिक सक्रिय यूजर्स हे ग्रामीण भागातील असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR