38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयप्रदूषणात भारत जगात तिसरा

प्रदूषणात भारत जगात तिसरा

दिल्ली ठरले सर्वांत प्रदूषित शहर

नवी दिल्ली : बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वांत प्रदूषित महानगर क्षेत्र तर जगातील १३४ देशांच्या राजधानीच्या शहरांपैकी दिल्ली हे सर्वांत प्रदूषित शहर आहे. हा निष्कर्ष नव्या पाहणीतून काढण्यात आला आहे.

याआधीही दिल्ली सर्वांत प्रदूषित राजधानीचे शहर असल्याची नोंद झाली होती. जगभरात २०२३ या वर्षात १३४ देशांपैकी सर्वांत प्रदूषित हवा असलेल्या देशांत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. स्वित्झर्लंडमधील आयक्यू एअर या संस्थेने २०२३ या वर्षात जागतिक स्तरावर हवेचा दर्जा कसा याबाबत संशोधन करून एक अहवाल तयार केला आहे.

नऊपैकी १ मृत्यू प्रदूषित हवेमुळे
हवेच्या दर्जाची तपासणी करणारी ३० हजारांहून अधिक केंद्रे व संशोधन संस्थेमार्फत संचालित होणारी हवेच्या दर्जाच्या मापनाची सेन्सर, विविध सरकारी संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या आयक्यू एअरचा २०२३ चा अहवाल तयार करण्यात सहभागी झाल्या होत्या.

जगात होणा-या दर नऊ मृत्यूंपैकी एक मृत्यू प्रदूषित हवेमुळे होतो. जगात दरवर्षी सत्तर लाख लोकांचा प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

भारतातील अब्जावधी लोकांना फटका
अहवालात २०१८ सालापासून जगातील सर्वांत प्रदूषित राजधानीचे शहर म्हणून दिल्लीचा आजवर चारवेळा उल्लेख करण्यात आला आहे. भारतातील १.३६ अब्ज लोक हवेतील २.५ पीएम पातळीत प्रति घनमीटर वाढलेल्या प्रदूषणाचा त्रास सहन करत आहेत. भारतातील ६६ टक्के शहरांमध्ये प्रति घनमीटर ३५ मायक्रोग्रॅम्स इतके वार्षिक सरासरी प्रमाण आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR