40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडा महिला आरसीबी संघाचा गौरव

 महिला आरसीबी संघाचा गौरव

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघाने महिला प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. आरसीबीच्या फ्रँचायझीला प्रथमच एखाद्या स्पर्धेचे जेतेपद जिंकता आले आहे. मागील १६ वर्षे आरसीबीच्या संघाने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. पण, त्यांना एकदाही स्पर्धेचा किताब जिंकता आला नाही. मात्र महिला संघाने अवघ्या दुस-याच वर्षी ही कामगिरी करून दाखवली. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील संघाने ट्रॉफी जिंकल्यानंतर पुरुष संघाकडून त्यांचा गौरव करण्यात आला. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या अनबॉक्स इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरुष संघातील सर्व शिलेदारांसह महिलांचा चॅम्पियन संघ उपस्थित होता.

खरं तर आरसीबीच्या अनबॉक्स इव्हेंटमध्ये आरसीबीच्या महिला संघाला पुरुष संघाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. स्मृती मंधाना आणि कंपनीने डब्ल्यूपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले. आयपीएल २०२४ च्या आधी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी अनबॉक्स इव्हेंटमध्ये, विराट कोहली आणि सहका-यांनी महिला संघाच्या खेळीला दाद दिली आणि त्यांचे कौतुक केले.

दरम्यान, यावेळी कर्णधार स्मृती मंधानाच्या हातात ट्रॉफी चमकत होती. महिला प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजेतेपदानंतर स्मृतीने आनंद व्यक्त केला. संघाची अष्टपैलू खेळाडू एलिसे पेरीला स्मृतीने यावेळी व्हीडीओ कॉलच्या माध्यमातून जल्लोषाचा नजारा दाखवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR