37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसैलानी यात्रेसाठी अकोला जिल्ह्यातून ५१ विशेष बस

सैलानी यात्रेसाठी अकोला जिल्ह्यातून ५१ विशेष बस

अकोला : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील हाजी अब्दुल रहमान (बाबा सैलानी) यांचा वार्षिक उरूस ३० मार्च रोजी उत्साहात साजरा होणार असून, यानिमित्त दर्शनाला जाणा-या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागाने शनिवार, २३ मार्चपासून विशेष बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला जिल्ह्यातील पाच आगारांमधून येत्या ४ एप्रिलपर्यंत सैलानी यात्रेसाठी ५१ बस सोडण्यात येणार आहेत. होळीनंतर बाबा सैलानी यांचा उरूस प्रारंभ होतो. राज्यातील विविध भागांतून भाविक पिंपळगाव सराई येथे जातात.

सैलानी यात्रेला जाण्यासाठी अकोला जिल्ह्यातील भाविक एसटी बसला प्राधान्य देतात. ही बाब लक्षात घेता महामंडळाने विशेष बस चालविण्याचे नियोजन केले आहे. अकोला विभागाने अकोला व वाशिम जिल्ह्यातील एकूण नऊ आगारांमधून सैलानी यात्रेसाठी १०० बसेसची व्यवस्था केली आहे. सहा कर्मचा-यांचे एक पथक पिंपळगाव सराई येथे तैनात ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यात्रा विशेष गाड्यांमधून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR