33.3 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeक्रीडायजमान श्रीलंकेला पराभूत करत भारताने जिंकली ट्रॉफी

यजमान श्रीलंकेला पराभूत करत भारताने जिंकली ट्रॉफी

कोलंबो : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने श्रीलंकेच्या मैदानात रंगलेल्या तिरंगी मालिकेतील फायनलमध्ये यजमान श्रीलंकेला ९७ धावांनी पराभूत करत ट्रॉफी जिंकली आहे.

या दोन संघांशिवाय या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सहभाग होता. आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ३४२ धावांचा डोंगर उभारून लंकेसमोर ३४३ धावांचे टार्गेट सेट केले होते.

या धावांचा पाठलाग करातना श्रीलंका महिला संघ ४८.३ षटकात २४५ धावांत आटोपला. गोलंदाजीत भारताकडून स्रेह राणा हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय अमनजोत कौरनं ३ विकेट्स आणि नल्लापुरेड्डी श्री चरणी हिने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR