28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयभारतीय सेनेला मिळणार ६ अमेरिकन अपाचे हेलिकॉप्टर

भारतीय सेनेला मिळणार ६ अमेरिकन अपाचे हेलिकॉप्टर

नवी दिल्ली : आता पायदळाच्या सैनिकांना युद्धभूमीत पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. शत्रूचे रणगाडे असोत किंवा कोणताही मोठा हल्ला असो, त्यांना नष्ट करण्यासाठी लष्कराला अटॅक हेलिकॉप्टर मिळणार आहेत. पुढील वर्षी लष्कराला ६ अमेरिकन अपाचे हेलिकॉप्टर मिळतील. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद नक्कीच वाढेल. तसेच भारतीय हवाई दलाकडे आधीच २२ अपाचे हेलिकॉप्टर आहेत. लष्कराला आपल्या कारवायांचा वेग वाढवण्यासाठी अटॅक हेलिकॉप्टरची गरज आहे. यामुळे दोघांमधील समन्वय सुधारेल आणि परिणामही उत्कृष्ट होईल.

अपाचे हेलिकॉप्टर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. ते हेलफायर आणि स्ट्रिंगर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. याशिवाय ७० मिमी हायड्रा रॉकेटही बसवण्यात आले आहेत. १२०० राउंड्स असलेली ३० मिमी चेन गनही बसवण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, बोइंगने मेसा, ऍरिझोना येथे भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यासाठी अपाचे हेलिकॉप्टरचे उत्पादन सुरू केले आहे. बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते म्हणाले की, भारताच्या संरक्षण क्षमतांना पाठिंबा देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठताना बोइंगला खूप आनंद होत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला टाटा बोईंग एरोस्पेस लि. (टीबीएएल) ने हैदराबादमधील प्रगत सुविधेतून भारतीय सैन्याला पहिले एएच-६४ अपाचे हेलिकॉप्टर पुरवले होते. पहिल्या अपाचे हेलिकॉप्टरचे उत्पादन सुरू झाले आहे. २०२४ पर्यंत सर्व हेलिकॉप्टर वितरित केले जातील. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथे या हेलिकॉप्टरची निर्मिती केली जात आहे. अपाचे व्यतिरिक्त भारतीय लष्कराकडे स्वदेशी अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर एलसीएच प्रचंड आहे. २००६ मध्ये सरकारने एलसीएच बनवण्याचे काम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएलवर सोपवले होते.

रडारद्वारे सहज शोधता येत नाही
अपाचे हेलिकॉप्टर दिवस-रात्र आणि कोणत्याही हवामानात काम करू शकतात. या हेलिकॉप्टरची रचना अशी आहे की ते रडारद्वारे सहज शोधता येत नाही. अपाचे अटॅक हेलिकॉप्टर जगातील प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असण्यासोबतच यात नाईट व्हिजन सेन्सर, जीपीएस मार्गदर्शन आणि रायफलचीही सुविधा आहे. याशिवाय हे हेलिकॉप्टर शत्रूच्या तटबंदीला भेदून त्यांच्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे.

अपाचे हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्ये
अपाचे हेलिकॉप्टरचा वेग ताशी २९० किलोमीटर आहे. २० हजार फूट उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम. ३६० डिग्री कव्हरेज क्षेत्र असल्याने ते आणखी धोकादायक बनते. वाळवंटी भागात अपाचे तैनात करण्यात येणार आहे. खऱ्या अर्थाने हे प्रगत मल्टीरोल कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढण्यास सक्षम.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR