34.5 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeराष्ट्रीयभारतीय लष्कराचे ब्रम्हास्त्र, सुपरसॉनिक ब्रम्होस

भारतीय लष्कराचे ब्रम्हास्त्र, सुपरसॉनिक ब्रम्होस

सीमेवर तणाव, भारतीय हद्दीतूनच शत्रूला उद्ध्वस्त करण्याची क्षमता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर देशात तणावाचे वातावरण आहे. त्यातच दुसरीकडे पाकिस्तानचा कांगावा आणि कुरापतीही वाढल्या आहेत. यादरम्यान भारतासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारताच्या हवाई शक्तीला लवकरच एक घातक धार मिळणार आहे. भारतीय हवाई दल आणि नौदल त्यांच्या राफेल लढाऊ विमानांमध्ये ब्रम्होस-एनजी (नेक्स्ट जनरेशन) सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तैनात करण्याची तयारी करत आहेत. २९० किलोमीटरचा पल्ला आणि ४१७० किमी/तास वेगाने उड्डाण करणारे हे क्षेपणास्त्र शत्रूवर अचूक आणि विनाशकारी प्रहार करण्यास सक्षम असणार आहे.

डिसॉल्ट एव्हिएशनने राफेलमध्ये भारताच्या स्वदेशी शस्त्र प्रणालींचे एकत्रीकरण करण्यास मान्यता दिली, ज्यामुळे ‘मेक इन इंडिया’मोहिमेलाही नवीन बळ मिळेल आणि भारताचे रणनैतिक स्वातंत्र्य आणखी मजबूत होईल. यामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. कारण पाकिस्तानला आधीच भारताच्या राफेल ताफ्याची चिंता होती. आता जेव्हा या अत्याधुनिक लढाऊ विमानांमध्ये ब्रम्होस-एनजीसारख्या घातक क्षेपणास्त्रे बसवली जातील, तेव्हा त्याचा त्यांच्या दहशतवादाला पाठिंबा देणा-या धोरणावर मोठा परिणाम होईल. आता भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याच्या शत्रूच्या प्रयत्नांना दिले जाणारे प्रत्युत्तर अधिक जलद, अधिक अचूक आणि प्राणघातक असेल, असे सांगण्यात आले.

राफेल हे पाकिस्तानच्या जेएफ-१७ सारख्या विमानांपेक्षा अनेक पटीने अधिक सक्षम आहे आणि ब्रम्होस-एनजीच्या समावेशानंतर ते एक धोरणात्मक स्ट्राइक प्लॅटफॉर्म बनेल. विशेष म्हणजे सीमा ओलांडल्याशिवाय हे क्षेपणास्त्र पाकिस्तानमधील कोणत्याही लष्करी तळाला, कमांड सेंटरला किंवा दहशतवादी लाँचपॅडला क्षणार्धात लक्ष्य करू शकते. हे क्षेपणास्त्र हवेतून सोडले जाणारे, जमिनीवरून आणि जहाजावरून मारा करणारे आवृत्त्यांमध्ये उपलब्ध असेल. याचा अर्थ जमीन, पाणी आणि आकाश या प्रत्येक आघाडीवर समान प्राणघातक शक्ती असणार आहे.

२०२६ मध्ये चाचणी, लखनौमधून उत्पादन
या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी २०२६ मध्ये होणार आहे आणि ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथे बांधल्या जाणा-या ब्रम्होस उत्पादन केंद्रात तयार केले जाणार आहे. हे केंद्र क्षेपणास्त्र उत्पादनात भारताच्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. ब्रम्होस-एनजी ही ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची हलकी आणि प्रगत आवृत्ती आहे, जी आधुनिक लढाऊ विमाने आणि मोबाइल प्लॅटफॉर्मवरून प्रक्षेपित करण्यासाठी विकसित केली जात आहे.

अचूक हल्ला
ब्रम्होस-एनजीचा वेग मॅक ३.५ (सुमारे ४१७० किमी/तास) आहे, ज्यामुळे तो शत्रूच्या रडार आणि संरक्षण प्रणालींना चुकवून अचूकतेने हल्ला करू शकतो. याची रेंज २९० किलोमीटर आहे, म्हणजेच हे मिसाईल सीमा ओलांडल्याशिवाय सीमेपलीकडे असलेल्या शत्रूंच्या महत्त्वाच्या तळांना नष्ट करू शकते.

हलके आणि कॉम्पॅक्ट डिझाईन
ब्रम्होस-एनजीचे वजन सुमारे १.५ टन आहे, जे मूळ ब्रम्होस क्षेपणास्त्रापेक्षा सुमारे ५० टक्के कमी आहे. त्यामुळे तेजस एमके-१ए, राफेल, मिराज-२०००, सुखोई-३० एमकेआयसारख्या लढाऊ विमानांमधून ते सहजपणे डागता येते. गुप्त वैशिष्ट्यांसह डिझाइन केले गेले आहे, त्यामुळे ते शत्रूच्या रडारवर अदृश्य असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR