24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeउद्योगभारतीय अर्थव्यवस्था ६.२ टक्क्यांनी वाढ

भारतीय अर्थव्यवस्था ६.२ टक्क्यांनी वाढ

फिचने विकास दराचा अंदाज वर्तविला मेक्सिकोही प्रगतीपथावर

नवी दिल्ली : भारतासाठी दिवाळीच्या काही दिवस आधी एक चांगली बातमी आली असून क्रेडिट रेटिंग एजन्सी फिचने भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज वाढवला आहे. एजन्सीने सोमवारी ही माहिती दिली. एजन्सीचे म्हणणे आहे की भारताची अर्थव्यवस्था मध्यम कालावधीत ६.२ टक्के दराने वाढू शकते.

ग्लोबल रेटिंग एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे की आम्ही भारत आणि मेक्सिकोला मोठ्या प्रमाणावर अपग्रेड केले आहे. भारताचा विकास अंदाज ५.५ टक्क्यांवरून ६.२ टक्के आणि मेक्सिकोचा विकास अंदाज १.४ टक्क्यांवरून २ टक्के करण्यात आला आहे. फिचने चीनच्या वाढीचा अंदाज ५.३ टक्क्यांवरून ४.६ टक्के, रशियाचा १.६ टक्क्यांवरून ०.८ टक्के, कोरियाचा २.३ टक्क्यांवरून २.१ टक्के आणि दक्षिण आफ्रिकेचा विकासदर १.२ टक्क्यांवरून १.० टक्क्यांवर कमी केला आहे. फिचच्या मते, अलीकडच्या काही महिन्यांत भारतातील रोजगार दरात सुधारणा झाली आहे. फिचच्या मते, भारताच्या श्रम उत्पादकतेचा अंदाजही इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे.

चीनची परिस्थिती काय?
फिचने सांगितले की, १० उदयोन्मुख बाजारपेठेतील वाढीचा अंदाज पूर्वीच्या ४.३ टक्क्यांवरून आता ४ टक्के करण्यात आला आहे. फिचच्या मते, यामागचे कारण चीनच्या कमी संभाव्य वाढीचा अंदाज आहे. १० उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये चीनचा वाटा ५७ टक्के आहे. चीनला वगळल्यास, ९ उदयोन्मुख बाजारपेठांसाठी सरासरी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ३.२ टक्के असू शकते, तर आधी ते ३ टक्के असण्याचा अंदाज होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR