30.2 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeमनोरंजन‘इंडियन पोलिस फोर्स’चा टीझर आऊट!

‘इंडियन पोलिस फोर्स’चा टीझर आऊट!

मुंबई : ‘इंडियन पोलिस फोर्स’ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या या सीरिजचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा वर्दीमध्ये अ‍ॅक्शन मोड पाहायला मिळाला आहे.

सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ सीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. सीरिजमधील कलाकारांचे लूक आऊट झाल्यानंतर प्रेक्षक टीझरची प्रतीक्षा करत होते. आता टीझर आऊट झाला असून प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘इंडियन पोलिस फोर्स’ या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘इंडियन पोलिस फोर्स’च्या टीझरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत. देशाचे संरक्षण करताना सिद्धार्थ, शिल्पा आणि विवेक पाहायला मिळणार आहेत. एका शहरात बॉम्बस्फोट होतो. या बॉम्बस्फोटामध्ये अनेकांचा जीव जातो. बॉम्बस्फोटानंतर दहशतवाद्यांचा बदला घेताना सिद्धार्थ दिसणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने ‘इंडियन पोलिस फोर्स’चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिले आहे, ‘इंडियन पोलिस फोर्स’ हा माझा पहिला अ‍ॅक्शनपट आहे. या सीरिजची मला उत्सुकता आहे. रोहित शेट्टीसोबत काम करताना मजा आली. ही सीरिज १९ जानेवारी २०२३ रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हीडीओवर पाहू शकता.

‘इंडियन पोलिस फोर्स’ ही सात भागांची सीरिज आहे. रोहित शेट्टीने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंह आणि ललित परिमू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजच्या माध्यमातून सिद्धार्थ ओटीटीवर पदार्पण करत आहे. १९ जानेवारी २०२४ रोजी भारतासह जगभरातील २४०पेक्षा अधिक देशांमध्ये ही सीरिज रिलीज होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR