22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाभारतीय नेमबाजांची खराब सुरुवात, १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेतून पडले बाहेर

भारतीय नेमबाजांची खराब सुरुवात, १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेतून पडले बाहेर

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजांची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय नेमबाज १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता स्पर्धेतूनच बाहेर पडले आणि त्यांना पदक फेरीत स्थान मिळवता आले नाही. रमिता आणि अर्जुन बाबौता या जोडीने एकूण ६२८.७ गुणांसह सहावे, तर इलावेनिल वालारिवन आणि संदीप सिंग यांनी ६२६.३ गुणांसह १२व्या स्थानावर आपली मोहीम संपवली

तीन शॉट्स शिल्लक असताना रमिता आणि अर्जुन पाचव्या स्थानावर होते आणि ते पदक फेरीसाठी पात्र होण्याच्या जवळ होते, परंतु भारतीय जोडी १.० गुणांनी मागे पडली. अर्जुनने दुस-या रिलेमध्ये चांगली सुरुवात करत १०.५, १०.६, १०.५, १०.९ असे स्कोअर केले, तर रमिताने दुस-या मालिकेत १०.२, १०.७, १०.३, १०.१ असे स्कोअर केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही जोडी अव्वल आठमध्ये राहिली. मात्र, हा स्कोअर पदक फेरी गाठण्यासाठी पुरेसा ठरला नाही. पदक फेरी गाठण्यासाठी अव्वल चारमध्ये स्थान मिळवणे आवश्यक होते. चीन, कोरिया आणि कझाकिस्तान या संघांनी पात्रता फेरीत पहिले तीन स्थान पटकावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR