20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपमध्ये पक्षांतर्गत ‘सर्जिकल स्ट्राईक’चे संकेत

भाजपमध्ये पक्षांतर्गत ‘सर्जिकल स्ट्राईक’चे संकेत

नागपूर : विशेष प्रतिनिधी
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या भाजपचं पीक जोमात आलं आहे, हे त्यांनी ठासून सांगितलं. तर या विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुती जोरदार कामगिरी बजावणार असल्याचा दावा केला. त्याचवेळी त्यांनी पक्षातंर्गत सर्जिकल स्ट्राईकचा बॉम्ब टाकला…

गडकरी हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. बेधडक वक्तव्यामुळे पण जनता त्यांच्यावर प्रेम करते. भाजपामध्ये अनेक जण येत आहेत. पक्षात गोतावळा वाढत आहे, असे सांगत त्याचवेळी त्यांनी पक्षांतर्गत सर्जिकल स्ट्राईक होणार असल्याचा बॉम्ब टाकला आहे. त्यांच्या वक्तव्याने आयाराम-गयाराम नेत्यांचे धाबे दणाणले आहे.

आपल्या देशात मतभेद ही काही समस्या नाही. पण विचारांचा, धोरणांचा अभाव ही मोठी समस्या आहे. सोयीच्या राजकारणाचे धोरण महत्त्वपूर्ण नाही, तर विचारधारेशी सुसंगत राजनीती महत्त्वाची असल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी नव्याने दाखल होत असलेल्या विविध विचारधारेतील कार्यकर्ते, नेत्यांना या माध्यमातून गर्भित इशारा पण दिला.

भाजपमध्ये इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विविध कारणांमुळे दाखल होत आहेत. जस जसे पीक जोमात येते. तसे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. चांगल्या धान्याला कीड लागते. पीक वाचावं यासाठी मग रोगावर कीटकनाशक मारावे लागते, असा इशारा त्यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR