33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रज्वारीची आवक वाढणार

ज्वारीची आवक वाढणार

बार्शी : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या रबी हंगामातील नवीन ज्वारीची आवक सुरू होऊन महिना झाला असला तरी मागील आठ दिवसांपासून आवक वाढली आहे. शनिवारी बाजारात सुमारे २५ हजार कट्टे ज्वारीची आवक आली आहे.

ज्वारीला प्रतीनुसार २००० ते ४६०० प्रति क्विंटल दर मिळत आहे. बार्शी बाजार समिती ही भुसार मालाच्या आवकसाठी प्रसिद्ध आहे. तसेच बार्शी तालुका हा ज्वारी उत्पादनासाठी ओळखला जातो.
बार्शी बाजार समितीत जामखेड, भूम, परंडा, वाशी, करमाळा, कर्जत, तुळजापूर आदी तालुक्यांतील शेतमाल विक्रीसाठी येतो. आता यंदाच्या हंगामातील नवीन ज्वारीची आवकही मागील महिन्यात सुरू झाली. मात्र, मागील आठ दिवसांपासून आवक वाढली आहे.

असे आहेत दर
दगडी ज्वारी : २००० ते २८००, मालदांडी : २७०० ते ३२००, ज्यूट ज्वारी : ३००० ते ४६०० याप्रमाणे मालाचा दर्जा पाहून दर मिळत आहे.

मागील महिन्याच्या तुलनेत उच्च प्रतीच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपये तर कमी प्रतीच्या ज्वारीच्या दरात ८०० रुपये दर कमी झाले असल्याचे ज्वारी खरेदीदार तुकाराम माने यांनी सांगितले.

आवक आणखी वाढणार
बार्शी व परिसरातील नवीन ज्वारी काढणीही सध्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात आवकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी यावेळी सांगितले.

यंदा दुप्पट माल
सध्या संपूर्ण शेतकरी मालाची आवक सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आवकही दुप्पट आहे. आवक वाढली असली तरी दर गेल्यावर्षीप्रमाणेच असल्याचे मर्चंट असोसिएशनचे सचिव महेश करळे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR