सोलापूर : सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी बरसला. शहरातील आसरा , गजानन नगर परिसरात गारांचा पाऊस झाला. दरम्यान या वादळी वाऱ्यामुळे या भागातील अनेक घरांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी या नुकसानग्रस्त भागाची आमदार सुभाष देशमुख यांनी पाहणी केली. या भागाचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
वादळी वारा आणि पावसामुळे शंकर नगर, टिकेकर वाडी, गजानन नगर येथील घरावरील अनेकांची पत्रे उडून गेली तसेच झाडे घरावर पडून घरांचे तसेच घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. आमदार सुभाष देशमुख यांनी या नुकसानग्रस्तांची भेट घेत तेथील नुकसानीची पाहणी केली यावेळी तेथील लोकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केल . आमदार सुभाष देशमुख यांनी लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे आश्वासन नुकसानग्रस्तांना दिले.
नुकसान ग्रस्त लोकांना पुरवले जेवणाचे डबे
रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक लोकांची घरे पडले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी संपूर्ण दिवसभर लोक चिंतेत होते आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांची भेट घेतली तसेच अन्नपूर्णा योजनेमार्फत ज्या लोकांचे घरे पडली आहेत अशा लोकांना लोकमंगल अन्नपूर्णा मधून जेवणाचे डब्बे देण्याची व्यवस्था केली.