32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeसोलापूरशहरातील आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

शहरातील आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातील आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिले. विभाग एकचे सहायक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्याकडे विशेष शाखेचा तर विशेष शाखेकडून अशोक तोरडमल यांची विभाग एककडे बदली झाली आहे. वाहतूक शाखेचा पदभार असलेले अजय परमार यांच्याकडे विभाग दोनची जबाबदारी देण्यात आली आहे तर विभाग दोनचे राजू मोरे यांना नियंत्रण कक्षात आणले आले. विशेष शाखेबरोबरच गायकवाड यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांच्याकडे सलगरवस्ती पोलीस ठाण्याचा पदभार तर जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांच्याकडे विशेष शाखा तर फौजदार चावडीचे विश्वनाथ सिद यांच्याकडे महिला सुरक्षा विशेष कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा शहरातील कालावधी पूर्ण झाला आहे, अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच आयुक्तालयाबाहेर होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR