27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद

पुण्यात आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद

पुणे प्रतिनिधी :
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटतर्फे दि. १५ ते १७ मार्च २०२४ दरम्यान ८ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह असणा-या रुग्णांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणा-या गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

परिषदेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून ‘आयसर’चे संचालक प्रा. सुनील भागवत आणि अतिथी म्हणून ‘एएफएमसी’ पुणे चे कमांडंट डॉ. (ले. जन.) नरेंद्र कोतवाल हे उपस्थित असतील. चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चीफ एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. उन्नीकृष्णन यांनी पत्रकारांना ही माहिती सांगितली.

मधुमेहाच्या गुंतागुंतीचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन प्रगती आणि मधुमेह व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मधुमेहाचा एक महत्त्वाचा जोखीम घटक म्हणजे स्थूलपणा, ज्याच्यावरील उपचारांबद्दल परिषदेमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल. विविध देशांतील तज्ज्ञ व ७० हून अधिक भारतीय तज्ज्ञ या परिषदेत संवाद साधणार असून २,००० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR