16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगरात इंटरनेट सेवा सुरू

छत्रपती संभाजीनगरात इंटरनेट सेवा सुरू

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते. त्यांची प्रकृती ढासळत असल्याने राज्यभरात आंदोलने सुरू झाली. बीड जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या. त्यामुळे बीडसह धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती. आता मनोज जरांगे यांनी उपोषण यामागे घेतले असून सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने खंडित झालेले व्यवहार देखील पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

सरकारने गुरुवारी एक शिष्टमंडळ पाठवत जरांगे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर जरांगे यांनी सरकारला आणखी दोन महिन्याची मुदत दिली आहे. तसेच जरांगे यांनी आपलं उपोषण देखील मागे घेतले आहे. जरांगे यांचा उपोषण सुटल्याने प्रशासनाने देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तसेच बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तर, एसटी बस सेवा देखील पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR