न्यूयॉर्क : १२ दिवसाच्या या लढाईत अमेरिका युद्धाच्या मैदानात एकदिवसासाठी उतरली. पण आपल्याला जे हवे होते, ते साध्य करून घेतले. इराणवर हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेने त्यांना चर्चेच्या टेबलावर येण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर हल्ला करण्याआधी सुद्धा शरण येण्यासाठी धमकावलेले. पण इराण ऐकत नव्हता. अखेर हल्ला करावा लागला. आता सीजफायर झाल्यानंतर इराण त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दल अमेरिकेसोबत चर्चा करण्यास तयार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.
मागच्या १२ दिवसांपासून इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेले युद्ध दोन दिवसांपूर्वी संपले. या युद्धात कोण जिंकले? कोण हरले? याच्या चर्चा सुरु आहेत. पण कुठल्याही युद्धात जय-पराजयापेक्षा रणनितीक उद्दिष्टय महत्त्वाच असते. इराण-इस्रायलच्या या युद्धात खरी बाजी कोणी मारली असेल, तर ती अमेरिकेने. अमेरिकेनेच दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी घडवून आणली. पण या युद्धामध्ये अमेरिकेने त्यांना जे हवे होते, ते साध्य करुन घेतले. आम्हाला अणवस्त्र संपन्न इराण मान्य नाही असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. म्हणूनच अमेरिकेने इराणच्या नतांज, फॉर्डो आणि एस्फान या तीन अण्विक तळांवर सर्वात शक्तीशाली बॉम्ब टाकले. जीबीयू- ५७ हे १३,६०० किलो वजनाचे बॉम्ब टाकून हे प्रकल्प पूर्णपणे नष्ट केले. त्यासाठी जगातील सर्वात घातक बी-२ स्पिरिट हे बॉम्बर विमान वापरले.
पुढच्या आठवड्यात चर्चा
पुढच्या आठवड्यात इराणसोबत आम्ही चर्चेची तयारी करत आहोत असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दल दोन्ही देशांमध्ये नवीन करार होऊ शकतो. आम्ही पुढच्या आठवड्यात चर्चा करणार आहोत. आम्ही करार करू शकतो. द हॅग्यु येथे नाटो परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. न्यूक्लियर शिवाय मला दुस-या कुठल्या कराराची पर्वा नाही असे ट्रम्प म्हणाले.
दोघेही थकलेले
इस्रायल आणि इराणमधील युद्ध का संपले? त्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की माझे दोघांसोबत बोलण सुरु होते. दोघेही थकलेले इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ला हा शक्तीच निर्णायक प्रदर्शन होते. मागच्या आठवड्यात इराणच्या अणूप्रकल्पांवर केलेला हल्ला अत्यंत यशस्वी ठरला. पृथ्वीवरील दुसरे कुठलही लष्कर हे करु शकत नव्हते. अमेरिकेच्या या शक्तीने शांततेचा मार्ग निघाला असे ट्रम्प म्हणाले.