मलायकाशी ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर पुन्हा प्रेमात ?

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी तो आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे नात्यात होते. मात्र बराच काळ डेट केल्यानंतर अखेर काही महिन्यांपूर्वी त्याचे ब्रेकअप झाले. मात्र मलायकाने त्यानंतर मूव्ह ऑन केले. ती, तिच्यापेक्षा लहान एका दुस-या तरूणासोबत वारंवार दिसल्यानंतर त्या दोघांबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या. तर या ब्रेकअपनंतर अर्जुनचे नाव कोणाशीही जोडले गेले नव्हते, त्याच्या बहीणीचे, अंशुला कपूरचेही नुकतेच लग्न झाले. पण तेव्हा अर्जुन एकटाच दिसत होता.

मात्र आता अर्जुनचे नाव एका अभिनेत्रीशा जोडले जात असून त्या दोघांमध्ये काहीतरी आहे, अशी कुणकुण चाहत्यांना लागली आहे. नुकतेच ते दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने तर चर्चांना आणखीनच उधाण आले. नुकताच इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर भारत. वि. इंग्लंड हा सामना रंगला,तयावेळी अर्जुन त्याच्या मिस्ट्री गल्रसोबत दिसल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या असून चाहत्यांचीही उत्सुकता वाढली आहे.

गेल्या काही दवसांपासून अभिनेता अर्जुन कपूरचं नाव जिच्याशी जोडलं ती म्हणजे अभिनेत्री साहिबा बाली. मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता त्यांचे नाव अभिनेत्री साहिबा बालीसोबत जोडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर आला आहे. काल, म्हणजेच रविवार, १९ जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेला तिसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी दोघेही स्टेडियममध्ये उपस्थित होते.

त्यांचे स्टँडमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्यांच्यात खरंच काही सुरू आहे का हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

व्हायरल फोटोमध्ये अर्जुन कपूर निळ्या रंगाच्या कपड्यांत, तर त्याच्या शेजारी काळा चष्मा लावलेली साहिबा बाली दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांनीही निळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने चाहत्यांचे लक्ष वेधलं गेलं. फोटो व्हायरल होताच नेटक-यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही युजर्सनी ‘दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे का?’ असा सवाल केला, तर काहींनी या कथित नात्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.

मात्र, अर्जुन कपूर आणि साहिबा बाली या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत किंवा सुरू असलेल्या डेटिंगच्या चर्चांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे दोघांमधील नात्याचे सत्य काय आहे, याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. मात्र असे असले तरी अर्जुन कपूर आणि साहिबा बाली यांची ही उपस्थिती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली असून, सोशल मीडियावर त्यांच्या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news