30.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइस्राईलने प्रथमच बॉम्बहल्ले थांबवले

इस्राईलने प्रथमच बॉम्बहल्ले थांबवले

जेरुसलेम : उत्तर गाझा सोडून दक्षिणे गाझाकडे जाण्यासाठी इस्रायली सैन्याने चार तासापासून बंद असलेल्या महामार्गावर बॉम्बहल्ल्या न करण्याचा कालावधी एक तासाने वाढवला आहे. बुधवारी, इस्रायली सैन्याने प्रथमच बॉम्बहल्ल्याला एक छोटा विराम लागू करून लोकांना क्षेत्र सोडण्याचा सुरक्षित मार्ग दिला. इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ‘आयडीएफने बुधवारी निर्वासन वेळ एक तासाने वाढवली आहे जेणेकरून अधिक लोक दक्षिणेकडे जाऊ शकतील.

एका महिन्याच्या तीव्र इस्त्रायली हल्ल्यात प्रथमच बुधवारी सर्वात कमी बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत.
गाझा शहरातील मध्य गाझामधील तीन मोठ्या भागात ही सूट देण्यात आली. हजारो लोक सलाह अल-दिन महामार्गाने पायी दक्षिणेकडे जात आहेत. याला मानवतावादी विराम (मानवतावादी आधारावर लहान विराम) असे म्हटले जात आहे.

तसेच इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सल्लागार मार्क रेगेव्ह यांनी सांगितले की, राफाह क्रॉसिंगजवळ दक्षिण गाझामधील भूमध्य समुद्राला लागून असलेल्या भागात ‘सेफ झोन’ तयार केला जाईल. इस्राईल नागरिकांचा मृत्यू कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, यासाठी इस्रायली सैन्य लोकांना उत्तर गाझा सोडून दक्षिण गाझाला जाण्यास सांगत आहे. दक्षिणेकडील भागात हवाई बॉम्बफेकीमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूबद्दल ते म्हणाले की, उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेत कमी हिंसाचार आहे. उत्तरेत हमाससोबत इस्रायली लष्कराचा संघर्ष सुरूच आहे.

रागेव म्हणाले की, भूमध्य समुद्राजवळ खान युनिसच्या पश्चिमेला अल मवासी येथे एक विशेष मानवतावादी क्षेत्र तयार केले जात आहे. त्यांच्या मते, “हे भूमध्य सागरी किनार्‍यालगतचे एक सुरक्षित क्षेत्र असेल जेथे हमासची कोणतीही पायाभूत सुविधा नाही. “आम्ही एक मानवतावादी सुरक्षित क्षेत्र तयार करण्याबद्दल बोलत आहोत जिथे फील्ड हॉस्पिटल असेल. इजिप्तकडे जाणाऱ्या रफाह क्रॉसिंगपासून हा परिसर जवळ असल्याने मानवतावादी मदतही येथे सहज पोहोचू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात शेकडो परदेशी नागरिक आणि जखमी पॅलेस्टिनी गाझामधून रफाह मार्गे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत तर काही मानवतावादी मदतीलाही या काळात गाझामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR