21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयगाझावर अणुबॉम्ब टाकणार : इस्त्रायल

गाझावर अणुबॉम्ब टाकणार : इस्त्रायल

जगाला भरली धडकी अणुबॉम्ब हा एक पर्याय

तेलअवीव : इस्­त्रायल-हमास युद्ध आता भयावह वळणावर पोहचल्­याचे स्­पष्­ट होत आहे. कारण युद्धात कोणते पर्याय आहेत, या प्रश्­नावर इस्रायली मंत्री अमिहाई एलियाहू यांनी दिलेल्या उत्तरात जगाला धडकी भरविणारा पर्याय सांगितला आहे. इस्रायलने हल्ला तीव्र करत असताना गाझावर अणुबॉम्ब टाकणार का, असा सवाल मंत्री एलियाहू यांना विचारण्­यात आला होता. यावर असता ते म्­हणाले की, गाझावर अण्वस्त्र सोडणे हा या युद्धातील एक पर्याय असू शकतो.

इस्रायलने गाझा येथील अल-अजहर विद्यापीठावर हवाई हल्ला केला आहे. पॅलेस्टाईनचे उप परराष्ट्र मंत्री अमल जदौ यांनी सांगितले की, इस्रायलने गाझा येथील अल-अजहर विद्यापीठावर बॉम्बहल्ला केला आहे असे वृत्त ‘अल जझीरा’ने दिले आहे. मंत्र्यांनी बॉम्बस्फोटाचा व्हीडीओही शेअर केला आहे. जादुओने शनिवारी रात्री वर केलेल्­या पोस्­टमध्­ये म्­हटले आहे की इस्रायली हल्ल्यांमध्ये रुग्णवाहिका, ३ रुग्णालये आणि ५ आश्रयस्थानांना लक्ष्य बनवले. या हल्­ल्­यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. दरम्­यान, मध्यपूर्वेच्या दौ-यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन रविवारी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेणार आहेत. ही बैठक वेस्ट बँक येथे होणार आहे.

हमासचे कृत्य भयंकर : ओबामा
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्­त्रायल-हमास युद्धावर आपले मत व्­यक्­त केले आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याचा संदर्भ देत, ते म्­हणाले की, हमासने इस्­त्रायलमध्­ये केले ते भयंकर कृत्य होते. त्याचे कोणतेही समर्थन नाही. मात्र पॅलेस्टिनी लोकांवरील हल्­ले अस करणारे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR