27.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रगरीब मराठ्यांना आरक्षण  देणे शक्य : प्रकाश आंबेडकर 

गरीब मराठ्यांना आरक्षण  देणे शक्य : प्रकाश आंबेडकर 

पुणे : गरीब मरांठ्यांना आरक्षण देणे शक्य असल्याचा दावा बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना केला.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर त्यांनी मोठा हल्ला केला. मराठा आरक्षण जाण्यास भाजप आणि अजित पवार जबाबदार आहेत. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा हवाला दिला. प्रकाश आंबेडकर यांच्या या आरोपामुळे आरक्षणावरील राजकारण रंगणार असे दिसते.
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अजित पवार आणि भारतीय जनता पक्षावर प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात परिच्छेद ५६ किंवा ५७ मध्ये महत्वाचा मुद्दा आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा समाज श्रीमंत आहे. आमच्यासमोर तसा अहवाल आला. त्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले. हा सर्व खेळ भाजपचा आहे. अजित पवार यांचा आहे. एनसीपीचा आहे. यामुळे यांच्यापासून गरीब मराठ्यांनी सावध राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
राज्यसरकार चॉकलेट देत आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही हे माहीत आहे. यामुळे सरकारने फसवा-फसवी करायला नको. यामुळे हा प्रश्न चिघळेल. ओबीसी आरक्षण वेगळे आणि गरीब मराठ्यांचे आरक्षण वेगळे आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण देता येणे शक्य आहे. आरक्षणासाठी दोघे एकमेकांच्या विरोधात लढत राहणार आहे, असे करु नये.
सरकारने केली अशी विभागणी
भाजपने मराठा आरक्षणाचा प्रश्न एकनाथ शिंदेवर सोडला तर फडणवीस यांच्यामार्फत ओबीसांना गोंजरले जात आहे. यामुळे ओबीसींनी ओळखावे की भाजप हा माकडाचा खेळ करत आहे. भाजपचा डाव कोणालाच आरक्षण द्यायचा नाही. सर्वांचे आरक्षण काढण्याचा आहे. भाजप रामाचे भक्त आहेत. परंतु ओबीसीचे भक्त नाहीत, असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR