पाटणा : बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानससंदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून, आता जगतगुरु श्री रामभद्राचार्य यांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. चंद्रशेखर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी येथे येऊन रामचरितमानसच्या सर्व संगतींवर चर्चा करावी. जर त्यात काही विसंगती आढळली, तर मी पाटण्याच्या गंगे समाधी घेईन अन्यथा त्यांना राजकारणातून सन्यास घ्यायला हवा, असे श्री रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. बिहारचे शिक्षणमंत्री प्रो. चंद्रशेखर यांनी रामचरितमानसमध्ये पोटॅशियम सायनाइड असल्याचा दावा केला होता.
बगहा येथील रामनगरात तिस-या दिवशीच्या कथे दरम्यान चंद्रशेखर यांना आव्हान देत रामभद्राचार्य म्हणाले, चंद्रशेखर यांचे म्हणणे आहे की, रामचरीत मानसमध्ये विसंगती आहे. जर त्यांना त्यांच्या आईने प्रामाणिकपणाचे दूध पाजले असेल तर, त्यांनी रामचरितमानसवर चर्चा करावी. जर मी हारलो, तर पाटण्याच्या गंगेत त्रिदंड फेंकून देईन. पण जर ते हारले, तर त्यांना राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल.