17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरजानकर मोहिते पाटलांच्या पाठिशी राहणार

जानकर मोहिते पाटलांच्या पाठिशी राहणार

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील नेते उत्तमराव जानकर हे कोणाला पाठिंबा देणार हा चर्चेचा व उत्सुकतेचा विषय ठरत आहे. परवा विमानाने थेट नागपूरला जावून देवेंद्र फडणवीसांना भेटणाऱ्या जानकरांनी माढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे जानकर हे आता लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनाच पाठिंबा देतील अशी आटकळ बांधली जात आहे. असं झालं तर भाजपा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

१९एप्रील रोजी वेळापूर येथील गरूड बंगल्यावर जानकर यांनी मेळावा आयोजीत केला आहे.या मेळाव्यात उत्तमराव जानकर भूमीका जाहीर करणार आहेत. माढा लोकसभेसाठी भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे. सुरुवातीला भाजपाच्या बाजूनी असणारी लढत आता मोहितेपाटलांचे पक्षांतरानंतर मोठी रंजक होत आहे. अशातच माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर हे कोणाला पाठिंबा देणार हा चर्चेचा विषय ठरत आहे. मंगळवारी जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे मेळाव्यात उत्तमराव जानकर मोहिते पाटील यांना पाठींबा जाहीर करतील अशी चिन्हे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR