28.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeधाराशिवबार्शी येथील मॅरेथॉनमध्ये जयप्रकाश कोळगे विजेते

बार्शी येथील मॅरेथॉनमध्ये जयप्रकाश कोळगे विजेते

धाराशिव : प्रतिनिधी
बार्शी जि. सोलापूर येथील फे्रंड्स ग्रुप व हेल्थ क्लब बार्शी यांच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत रूईभर ता. धाराशिव येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. जयप्रकाश कोळगे यांनी विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी १० किलोमीटर मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांचा आठवा क्रमांक आला. यावेळी आयोजकांंच्या वतीने त्यांचा प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.

रूईभर येथील ४६ वर्षीय प्रा. जयप्रकाश कोळगे हे राष्ट्रीय दर्जाचे खो-खो खेळाडू आहेत. ते दररोज रूईभर ते धाराशिव व परत धाराशिव ते रूईभर असा जवळपास २४ किलोमीटर धावण्याचा सराव करतात. त्यांनी धाराशिव हाफ मॅरेथॉनमध्ये यापुर्वी अनेकवेळा सहभाग घेतला आहे. एकेवेळी त्यांनी २१ किलोमीटरमध्ये विजेतेपद पटकावले होते. बार्शी येथे फे्रंड्स ग्रुप व हेल्थ क्लबच्या वतीने आयोजित १० किलोमीटर मॅरेथॉनमध्ये विजेतेपद पटकावले. त्यांचा आठवा क्रमांक आला. आयोजकांच्या वतीने त्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल मित्र कंपनीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR