धाराशिव : प्रतिनिधी
उमरगा शहरातील मलंग प्लॉटींग येथे चोरट्यांनी महेश हेबळे यांचे घर फोडले. घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. चोरीची ही घटना दि. १८ जानेवारी रोजी भरदुपारी घडली. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाणे येथे दि. १९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा शहरातील मलंग प्लॉटींग येथे राहणारे महेश बस्वराज हेबळे हे बाहेर गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधऊन त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉकर तोडून कपाटामधील ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३९ तोळ्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम ५० हजार रूपये असा एकूण १ लाख २७ हजार रूपये किंमतीचा माल चोरट्यांनी चोरुन नेला. या प्रकरणी महेश हेबळे यांनी दि.१९ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे कलम ४५४, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.