24 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रजिजाऊ जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा

बुलढाणा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (शुक्रवारी) ४२६ वी जयंती. राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात शुक्रवारी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली, तर राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतून नागरिक जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केले. यामुळे सिंदखेडराजा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. महिला, पुरुष, युवकांनी आकर्षक पेहराव करून जिजाऊंना अभिवादन केले. शहरासह तालुक्यातील जाधव वंशजांनी सपत्नीक महापूजा केली. राजे लखोजी जाधव यांच्या वंशजांनी राजमाता जिजाऊंची आरती केली आणि जिजाऊंना वंदन केले. त्यानंतर राजवाडा परिसरामध्ये फटाक्याची आतषबाजी करत जन्मोत्सव सोहळा साजरा केला गेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR