रांची : वृत्तसंस्था
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि त्यांच्या आघाडीने त्यांचे सरकार अबाधित ठेवण्यात यश मिळवले. झारखंड मुक्ती मोर्चासह कॉंग्रेस आघाडीने ८१ पैकी ५४ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे राज्यात झामुमो आघाडीला बहुमत मिळाले असून, पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.
एकीकडे महाराष्ट्रात महायुतीने विरोधी महाविकास आघाडीचा सफाया केलेला असताना झारखंडमध्ये झामुमो-कॉंग्रेस आघाडीने सत्ता कायम राखली.
झारखंडमध्ये ८१ पैकी सर्वाधिक ३४ जागांवर झामुमोने विजय मिळविला. त्यानंतर भाजपने २१, तर कॉंग्रेसने १६ जागांवर विजय संपादित केला. यासोबतच राजदने ४ आणि कम्युनिस्ट पार्टीने २ आणि इतरांनी ४ जागांवर विजय मिळविला.
राज्यात झामुमो, कॉंग्रेस आणि राजदची आघाडी असल्याने येथे पुन्हा झामुमोच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली जाणार आहे. ८१ जागांसाठी तब्बल १२११ उमेदवार मैदानात होते. या निवडणुकीत झामुमो-कॉंग्रेस आघाडीने ५६ जागांवर विजय मिळवित राज्याची सत्ता राखली, तर एनडीएने २४ आणि इतर एक जागांवर विजय मिळविला.