25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयजेएन १ सातत्याने लक्षणे बदलतोय!

जेएन १ सातत्याने लक्षणे बदलतोय!

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या नव्या जेएन. १ सब-व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा सब-व्हेरियंट जेएन १ मुळे देशासह जगभरात नव्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे जेएन १ सब-व्हेरियंट हा ओमायक्रॉन या सर्वाधिक संसर्गजन्य प्रकारातील आहे, त्यामुळे याचा संसर्ग वेगाने होत आहे. देशासह जगभरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण नवीन जेएन. १ सब-व्हेरियंटचे आहेत.

आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कोरोनाचा नवा जेएन १ व्हेरियंट दिवसेंदिवस लक्षणे बदलतोय. गेल्या काही महिन्यांत कोरोनाच्या जेएन १ व्हेरियंटच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहेत. या व्हेरियंटचा संसर्ग वेगाने होत असला, तरी आतापर्यंत बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी आणि थकवा ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे व्हायरल फ्लू किंवा इतर श्वसन आजाराशी संबंधित आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी मॅक्स हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन विभागाचे एचओडी डॉ. राजीव डांग यांनी सांगितले की जेएन वेरिएंट ब-याच केसेसमध्ये फ्लूसारखा आहे.

डब्ल्यूएचओने सुद्धा या व्हेरिएंटला गंभीर मानलेले नाही. सध्या उपलब्ध असलेली कोविड लस नवीन सब व्हेरिएंट जेएन.१ रोखण्यात प्रभावी आहे, अशी हऌड आणि उऊउ ने पृष्टी केली आहे. जेएन.१ वेरिएंट ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे. सध्याची व्हॅक्सीन याचा प्रभाव कमी करु शकते. व्हॅक्सीनेशनने हॉस्पिटलायजेशन आणि मृत्यू संख्येवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. कोविड वायरसमध्ये जो सतत बदल होतोय, त्यावरुन यूनिवर्सल व्हॅक्सीनवर सुद्धा काम सुरु आहे. भारत बायोटेकचे शास्त्रज्ञ अशा व्हॅक्सीनवर काम करत आहेत. जी सगळ्याच व्हेरिएंटवर प्रभावी ठरेल.

नव्या व्हेरियंटचा धोका सर्वाधिक
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका पाहता धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, हे धोक्याचे लक्षण आहे. वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये नव्या व्हेरियंटचा धोका वाढतो. या नवा व्हेरियंट आणि ओमायक्रॉन या दोन्ही विषाणूंमध्ये साम्य असलेली एक गोष्ट म्हणजे हे दोन्ही अत्यंत संसर्गजन्य आहेत. या विषाणूचे जसजसे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. तसतसा हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य होत असल्याचे दिसून येत आहे.

अधिक संसर्गजन्य
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या दाव्यानुसार, जेएन १ व्हेरियंट एकतर अधिक संसर्गजन्य आहे किंवा आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीपासून बचाव करण्यासाठी अधिक कार्यक्षम आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR