भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

जालना : प्रतिनिधी
लोकनेते पोस्टरवर नव्हे, लोकांच्या हृदयात असतात आणि त्या हृदयांवर सत्तेची मस्ती कधीच चालत नाही, अशा शब्दांत मराठा क्रांती मोर्चाने संतप्त भावना व्यक्त करत लोकनेते आणि माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा इतिहास पुसण्याची भाषा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निषेधार्थ त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी जुना जालना भागात करण्यात आलेल्या या आंदोलनात अरविंद देशमुख, अशोक पडूळ, विश्वंभर तिरुके, मंगेश मोरे, धनंजय पोहेकर, सागर पाटील, किरण देशमुख, योगेश सोळंके, अर्जुन गायकवाड, आनंद जाधव, नितीन सुरुंग, गणेश सोळंके, अर्जुन घारे, शुभम नवघरे, गणेश कापसे, गजानन खराबे, कार्तिक काळे आदी उपस्थित होते. लातूर येथे रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपचा असभ्य, असंस्कृत आणि विखारी चेहरा उघडा पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ही साधी टीका नसून सत्तेची मस्ती आणि गुर्मी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अरविंद देशमुख म्हणाले की, लोकनेत्यांचे नाव पुसण्याची भाषा वापरणे म्हणजे इतिहास, लोकभावना आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा थेट अपमान आहे.

मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. हा मोर्चा सत्तेसाठी नव्हे, तर समाजासाठी उभा असलेला असून समतोल, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारा आहे. लातूर असो वा संपूर्ण महाराष्ट्र लोकांच्या मनातून विलासराव देशमुखांचे नाव कोणीही पुसू शकत नाही. नेतृत्वच जर विखारी असेल, तर कार्यकर्त्यांना कोणते संस्कार दिले जात आहेत, हा गंभीर प्रश्न आज महाराष्ट्रासमोर उभा राहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विलासराव देशमुख हे सुसंस्कृत, खानदानी आणि लोकनेते म्हणून कायम स्मरणात राहिले आहेत.

विरोधी विचारधारांमध्ये असूनही त्यांची मैत्री गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत आदर्श मानली जात होती. त्या काळात मतभेद होते; पण त्याहून मोठ्या होत्या राजकीय मर्यादा, परस्पर सन्मान आणि सभ्यता. मराठा क्रांती मोर्चा अशा घाणेरड्या आणि इतिहासविरोधी राजकारणाचा जाहीर निषेध करीत असून, लोकनेते पोस्टरवर नव्हे, लोकांच्या हृदयात असतात आणि त्या हृदयांवर सत्तेची मस्ती चालत नाही, याची जाण रवींद्र चव्हाण यांनी असू द्यावी असे अरविंद देशमुख म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news