बीड : बीड शहरात यश देवेंद्र ढाका या तरुणाची काल रात्री हत्या करण्यात आली. या हत्येमागचे कारण मित्रासोबत वाढदिवस साजरा करताना वाद झाला वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झाले आणि त्यातूनच यशचा मित्र सुरज काटे याने धारदार शस्त्राने वर्दळीच्या ठिकाणी पोटात चाकू खुपसवून यश चाखून केला. महिन्याभरापूर्वी यश आणि सुरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले. त्यामुळे त्यांच्यात वैमानस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचे कारण समोर आले आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केलीये. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे.
यश हा २२ वर्षाचा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा. वर्र्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा हादरले असून या घटनेने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करत आहे. यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे. दरम्यान या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
















