नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बुधवारी सरन्यायाधीश पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश आहेत. ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत सरन्यायाधीश पदावर राहतील. वृत्तसंस्थेशी बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायव्यवस्था ही देशातील नागरिकांसाठी आहे आणि नेहमीच राहील. लोकांना खात्री दिली पाहिजे की, न्यायव्यवस्था त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी अस्तित्वात आहे. न्यायव्यवस्था ही देशातील नागरिकांसाठी आहे आणि नेहमीच राहील.
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी पारदर्शकता वाढविण्याचे काम केले. तसेच सर्वोच्च न्यायालयात
एलजीबीटीक्यूआयए प्लस समुदायाचा समावेश करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली. यादरम्यान, सार्वजनिक जीवनावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर सरन्यायाधीशांनी निर्णय दिले. त्यांनी अशा सुधारणा सुरू केल्या ज्यामुळे आगामी काळात न्याय वितरण प्रणालीची कार्यक्षमता वाढेल.