24.3 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeपरभणीकास्ट्राईब दिव्यांग विभाग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना कार्यकारिणी जाहीर

कास्ट्राईब दिव्यांग विभाग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना कार्यकारिणी जाहीर

परभणी : कास्ट्राईब दिव्यांग विभाग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांची बैठक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी पतसंस्था परभणी येथे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नव नियुक्त जिल्हाध्यक्ष सोपानराव कांबळे यांनी कार्याध्यक्ष यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सदर कार्यक्रमात कांबळे यांची जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचाही करण्यात आला. यावेळी जिल्ह्याची आणि तालुका कार्यकारणी घोषीत करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणुन महासचिव सतीष कांबळे, चंद्रकांत आलोने, जिल्हाध्यक्ष, आनंद हिंगोले प्रसीध्दी प्रमुख म.रा. यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाध्यक्ष सोपान कांबळे, उपाध्यक्ष विलास राठोड, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, सचिव प्रकाश जाधव, सहसचिव ज्ञानेश्वर राठोड, जिल्हा संघटक संभाजी लासे, सुभाष वाघ, मुख्य सल्लागार विष्णु वैरागड, पुंजाजी बुणगे, कोषाध्यक्ष गोपीनाथ घनघाव, प्रसिद्धी प्रमुख आनंद हिंगोले, जिल्हा महिला सघटक वंदना पाईकराव, शिवकन्या ठाकूर, निलीमा साळुंके, अनिता आरळकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी तालुका अध्यक्ष कार्यकारणीत पूर्णा विश्वनाथ कदम, जिंतूर राजू गवई, सेलू मानवत पाथरी राहुल जुमडे, गंगाखेड सखाराम चोरमले, पालम बळवंत देशमुख यांची निवड करण्यात आली. लवकरच जिल्हा समाज कल्याण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बैठक लाऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्या बाबत कार्याध्यक्ष यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR