40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा १७२ धावांनी पराभव केला आहे. वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ३६९ धावांचं लक्ष्य दिलं होते.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९६ धावांत सर्वबाद झाला. परिणामी ऑस्ट्रेलियाने १७२ धावांनी पहिला सामना जिंकला. गेल्या दोन दशकांतील २० कसोटींमध्ये ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवरचा हा १७ वा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला असून इंडियाने न्यूझीलंडला मागे टाकत या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.

ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर न्यूझीलंडच्या गुणांत घसरण झाली असून न्यूझीलंड ७५ गुणांवरून ६० गुणावर आला आहे. त्याने आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले असून तीन जिंकले आहेत. किवी संघाला एकात पराभव पत्करावा लागला आहे. किवी संघ ३६ गुण आणि ६० गुणांसह दुस-या स्थानावर घसरला आहे. तर भारताने आठपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR