कौसडी(परभणी) : ग्रामपंचायतच्या ग्रामसभा व मासिक सभा न घेणे आलेला निधी परस्पर खर्च करणे अशा विविध कारणामुळे कौसडी ग्रामपंचायतच्या ९ सदस्यांनी जिल्हाधिका-याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कौसडी येथील सरपंच मोबीन कुरेशी यांना उर्वरित कालावधीसाठी पदावरून बडतर्फ केले आहे.
तर ग्रामसेवक बाबासाहेब खराबे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम सात नुसार विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. या अनुषंगाने कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी पुढील कारवाई तात्काळ सुरू करावी असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी २७ जून रोजी दिले आहेत. या प्रकरणात अँड घुगे यांचे मार्फत अर्ज दाखल केला व अॅड. अक्षय होंडे, अॅड. शहाजी डाखोरे, अॅड. सोमनाथ दहिफळे यांनी सहकार्य केले.