घरात १० दिवसांचा अन्नसाठा शिल्लक ठेवा; १७ देशांचा नागरिकांना इशारा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात सध्या वेगळ्याच घडामोडी पाहायला मिळत आहेत. युरोपपासून आशियापर्यंत तब्बल १७ देशांनी आपल्या नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. घरात किमान तीन दिवस पुरेल इतका अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याचे आवाहन अनेक सरकारांनी केले आहे. काही देशांनी तर सात ते दहा दिवसांचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जग एखाद्या मोठ्या संकटाच्या तयारीत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रिटनने नागरिकांना किमान तीन दिवस पुरेल इतका अन्न आणि पाण्याचा साठा ठेवण्यास सांगितले आहे. जपाननेही तीन दिवसांचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला असून, शक्य असल्यास तो एका आठवड्यापर्यंत वाढवण्याचे आवाहन केले आहे.

बेल्जियम, फ्रान्स, नेदरलँड्स आणि फिनलंड या देशांनी किमान ७२ तासांची तयारी ठेवण्यास सांगितले आहे. तर स्वीडन आणि नॉर्वेने नागरिकांना सात दिवस स्वत:च्या गरजा भागवता येतील, अशी व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे.
जर्मनीने तीन ते दहा दिवसांचा साठा ठेवा असल्याचे म्हटले आहे. तैवानमध्येही नागरिकांना एका आठवड्याच्या गरजेपुरत्या वस्तू घरात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र, या सूचनांचा अर्थ जगात युद्ध सुरू होणार आहे किंवा एखादी मोठी आपत्ती येणार आहे, असा होत नाही. सरकारांनी कोणत्याही युद्धाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण भविष्यात अचानक संकट निर्माण झाल्यास मदत पोहोचण्यास वेळ लागू शकतो, याची जाणीव सरकारांना झाली आहे.
वीजपुरवठा अनेक दिवस खंडित झाला तर एटीएम बंद पडू शकतात. ऑनलाइन पेमेंट सेवा ठप्प होऊ शकतात. मोबाईल नेटवर्क बंद पडू शकते. पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था कोलमडल्यास सुपरमार्केटमधील वस्तूही मिळणे अवघड होऊ शकते. अशा वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

युक्रेनमधील युद्ध, कोरोना आणि जगभरात वाढणा-या नैसर्गिक आपत्तींचा अनुभव लक्षात घेऊन अनेक देशांनी ही खबरदारी घेतली आहे. पूर, वणवे, वादळे, उष्णतेच्या लाटा, सायबर हल्ले आणि आंतरराष्ट्रीय तणाव यामुळेही मोठे संकट निर्माण होऊ शकते.

नागरिकांनी घरात काय साठवून ठेवावे?
पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ, आवश्यक औषधे, टॉर्च, अतिरिक्त बॅटरी, पॉवर बँक, रेडिओ आणि काही रोख रक्कम घरात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वस्तू एकाच वेळी खरेदी करण्याऐवजी हळूहळू साठवून ठेवाव्यात. घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची गरज नाही. हा इशारा घाबरवण्यासाठी नसून नागरिकांना सतर्क करण्यासाठी आहे. संकट कधी आणि कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगता येत नाही. मात्र, अशा वेळी किमान काही दिवस स्वत:च्या गरजा भागवता येतील, एवढी तयारी असणे गरजेचे आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news