मुंबई : बॉलिवूडचा किंग खान त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पठाण’, ‘जवान’नंतर शाहरूखच्या ‘डंकी’ सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
‘डंकी’ सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी काहीच दिवस बाकी राहिल्यामुळे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. ‘डंकी’ च्या प्रमोशन दरम्यानचा शाहरूखचा एक व्हीडीओ समोर आला आहे.
नुकताच दुबईमध्ये ‘डंकी’चा प्रमोशन इव्हेंट पार पडला. शाहरूखनेही या प्रमोशनला हजेरी लावली होती. किंग खानच्या चाहत्यांनी दुबईतील या इव्हेंटला गर्दी केली होती. चाहत्यांसाठी या इव्हेंटमध्ये शाहरूखने त्याच्या छैय्या छैय्या या आयकॉनिक गाण्यावर डान्स करत दुबईतील चाहत्यांना देसी वाईब्स दिल्या. त्याचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओत शाहरूख ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर थिरकताना दिसत असून गाण्याच्या हूक स्टेपही करत आहे.