22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरकरांना माहितीय, मी खोलात जाईन

कोल्हापूरकरांना माहितीय, मी खोलात जाईन

एकेरी टीकेनंतर मुश्रीफांवर आव्हाडांचा हल्लाबोल

मुंबई : जितेंद्र आव्हाड हे भ्रमिष्ट झाले आहेत, एकाकी पडले आहेत त्यामुळे ते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत, अशा पद्धतीचा पलटवार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. जर भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चेमध्ये मी नसतो तर मंत्री झालो असतो का? असा सवाल देखील हसन मुश्रीफ यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी मंत्री हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर दिले आहे. एकेरी शब्द वापरणे ही मुश्रीफांची संस्कृती आहे. तुम्ही माझ्या नादी लागू नका, मी तुमच्या नादाला लागलो नाही अस्े उत्तर आव्हाड यांनी दिले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकेरी शब्द वापरणे ही त्यांची संस्कृती आहे. मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनात पाच मिनिटे सुद्धा बोललेलो नाही. २०१९ ला पवार साहेबांच्या घरी मीटिंग झाली होती त्यावेळी सगळे नेते उपस्थित होते. त्यावेळी भाजपसोबत जाण्यासाठी मुश्रीफ यांनी टोकाचा विरोध केला होता. मी पत्रावर सही केली पण बाहेर आल्यावर जयंत पाटील यांना सांगितले की, मला हे मान्य नाही. जयंत पाटलांना देखील ते मान्य होतं. ते पत्र आजही जयंत पाटलांच्या खिशात आहे.

मी कधी कोणाला धोका दिला नाही. एकदा लढाई करायची ठरवली तर पुढे जो निर्णय होईल तो होईल. सदाशिव मंडलिक यांच्यासोबत तुमचे काय संबंध होते, त्यांनी तुम्हाला कुठपर्यंत आणले हे सर्व कोल्हापूरकरांना माहीत आहे. माझ्या नादाला लागू नका, बोलायला गेलो तर मी खूप खोलात जाईन. मी कधीच गद्दारी केली नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

फुले-शाहू-आंबेडकर एका मांडीवर आणि गोळवलकर दुस-या मांडीवर, अजित पवारांवर निशाणा
अजित पवारांवर देखील जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकर एका मांडीवर आणि गोळवलकर त्यांच्या एका मांडीवर आहेत. कर्नाटकातील बुरखा बंदीवर जितेंद्र आव्हाड म्हणाले, या देशात कोणी काय खावे? कोणी काय घालावे? कोणी कोणत्या धर्माचा आदेश मानावा हे त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर अवलंबून असते. विधानाने दिलेले हे स्वातंत्र्य आहे. संविधान हे कुठल्याही सरकारपेक्षा मोठे असते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR