९ वर्षांनी लहान बिझनेसमॅनला डेट करतेय क्रिती सेनॉन

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री क्रिती सेनॉन हिच्या वैयक्तिक आयुष्याची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. ती लंडनमधील प्रसिद्ध उद्योगपती कबीर बाहियाला डेट करत असल्याचे बोलले जात असून, यापूर्वीही अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र दिसले आहेत. मात्र, नुकत्याच अ‍ॅजबेस्टन येथे पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान या जोडीने स्टेडियममध्ये लावलेल्या हजेरीने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

सामना सुरू असताना जेव्हा कॅमेरा प्रेक्षक गॅलरीतील क्रिती आणि कबीर यांच्याकडे गेला, तेव्हा त्यांच्या अगदी मागे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा देखील सामना पाहताना दिसून आला. कबीरचे धोनी कुटुंबाशी अत्यंत जवळचे नाते असून, तो धोनीची पत्नी साक्षी धोनी हिचा चुलत भाऊ म्हणजेच नात्याने धोनीचा मेहुणा लागतो.

कबीर बाहिया हा लंडनमधील एक नामांकित व्यावसायिक असून तो अत्यंत वैभवशाली जीवनशैली जगतो. धोनी कुटुंबाच्या विविध कौटुंबिक सोहळ्यांमध्ये आणि सुट्यांच्या नियोजनात तो नेहमीच त्यांच्यासोबत सहभागी असतो. कबीरचे वडील कुलजिंदर बाहिया हे युनायटेड किंग्डममधील प्रसिद्ध ट्रॅव्हल एजन्सी ‘साऊथ हॉल ट्रॅव्हल’चे संस्थापक आहेत. या व्यावसायिक पार्श्वभूमीमुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंत खेळाडूंशी कबीरचे सलोख्याचे संबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच क्रिती सेनॉनने तिचा ३४ वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला होता, ज्यामध्ये तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसह कबीरनेही हजेरी लावली होती.

क्रिती सनॉन आणि कबीर बाहिया या दोघांनीही अद्याप आपल्या प्रेमसंबंधांची माध्यमांसमोर अधिकृत कबुली दिलेली नाही, मात्र सोशल मीडियावर त्यांच्या एकत्र फिरण्याचे अनेक फोटो सातत्याने समोर येत असतात.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news