19.3 C
Latur
Saturday, November 9, 2024
Homeमहाराष्ट्रलाखो साईभक्त शिर्डीत दाखल

लाखो साईभक्त शिर्डीत दाखल

भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार साई मंदिर

शिर्डी : शिर्डीत शनिवारपासून सुरू झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. साईबाबांच्या मंदिरात काल सुरू झालेल्या साईचरित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती आज करण्यात आली.

अखंड पारायण समाप्ती मिरवणुकीत संस्थानचे अध्­यक्ष तथा प्रधान जिल्­हा न्­यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, मुख्­य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आणि इंग्लिश मिडीयम स्­कूलचे प्राचार्य आसीफ तांबोळी यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई संस्थानकडून गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई समाधी मंदिर रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली.

गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमाही म्हटले जाते. तीन दिवस चालणा-या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला १९०८ साली साईबाबांच्या अनुमतीने सुरू करण्यात आले होते. साईबाबांचे परमभक्त तात्यासाहेब नुलकर आणि तात्या कोते पाटील तसेच काही भक्तांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरू मानून त्यांची पूजा केली होती. तेव्हापासून शिर्डीमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवाला सुरुवात झाली.

देशाच्या कानाकोप-यातून लाखो भक्त शिर्डीत : साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी आज देशाच्या कानाकोप-यातून लाखो भक्त आले आहेत. पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साईभक्त सुभा पै. अमेरिका यांच्या देणगीतून मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर आणि परिसरात केलेल्­या आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्­तांचे लक्ष वेधून घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR