मस्साजोगच्या सरपंचपदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांची पत्नी अर्ज भरणार

बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला १ वर्षाचा कालावधी उलटला असून या प्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत. दुसरीकडे आता, येथील ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मस्साजोगचा नवा सरपंच कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेच गावचा कारभार हाती घेतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, आता मस्साजोगच्या सरपंच पदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

देशमुख कुटुंबीयांनी एकमताने आणि ग्रामस्थांशी विचार विनिमय, चर्चा करुन अश्विनी देशमुख यांचे नाव निश्चित केले आहे. त्यानुसार, उद्या सकाळी ११.०० वाजता सरपंच पदासाठी त्या आपला उमेदवारी अर्ज साध्या पद्धतीने दाखल करणार आहेत. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे सरपंच पद रिक्त झाले होते. आता, नव्याने गावचा कारभार हाती घेणा-या नवीन सरपंचांचा कालावधी १८ महिने इतका असणार आहे.

मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा अर्ज भरुन त्यांना बिनविरोध सरपंच पद द्यावे अशी गावक-यांची अपेक्षा आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरपंच पद देणे हीच खरी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली असणार आहे अशी गावातील महिला वर्गाचीही मागणी आहे. तर, त्यांना सरपंचपदाचा अनुभव असल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news