24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरस्मार्ट प्रकल्पातंर्गत लातूर बाजार समिती अव्वल

स्मार्ट प्रकल्पातंर्गत लातूर बाजार समिती अव्वल

लातूर : राज्यात नावलौकीक असलेल्या लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीने स्मार्ट प्रकल्पातंर्गत शेतमाल विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीतील पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्रम व इतर निकषांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत राज्यात १६ वा, तर मराठवाडा, छत्रपती संभाजी नगर विभाग व लातूर जिल्हयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची २०२२-२३ या आर्थिक वर्षाची कामगिरीच्या आधारावर ही वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात येते. बाजार समित्यांची संबधित तालुका व जिल्हा स्तरीय समितीने पडताळणी केलेल्या माहितीनुसार व गुणांकन पद्धतीनुसार प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे राज्यातील ३०५ बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली असून यात लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीने २०० पैकी १३९ गुण मिळवत १६ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच जिल्हयातील औसा, उदगीर, औराद शहाजनी, अहमदपूर, चाकूर, जळकोट, देवणी, निलंगा, शिरूर अनंतपाळ, रेणापूर बाजार समितीेही क्रमवारीत मुसांडी मारली आहे.

लातूर बाजार समितीने गेल्या वर्षभरात मार्केट फी, मागील थकबाकी, गळयांची भाडे वसूली मोठया प्रमाणात राबवत काटकसर करून कमी खर्च करत जास्त उत्पन्न मिळवले आहे. तसेच इतर बाजार समित्यांच्या तुलनेत शेतकरी शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतक-यांनाही समजणार आहे. या क्रमवारीमुळे शेतक-यांना अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा बाजार समितीमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे.

उच्चांकी उत्पन्न वाढविले
लातूर बाजार समितीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात मार्केट फी, थकबाकी वसूली, भाडे वसूली मोठया प्रमाणात केल्यामुळे बाजार समितीचे उच्चांकी उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच या वर्षात खर्च कमी करण्यावर भर देत ठेवीवरील व्याजाचे उत्पन्नही वाढवले आहे. राज्यातील ३०५ बाजार समितींच्या तुलनेत लातूर बाजार समितीने २०० पैकी १३९ गुण मिळवत १६ वे स्थान पटकावले आहे. बाजार समितीने आर्थिक कामकाज निकषात २०.५ गुण, वैधानिक कामकाजात ४३ गुण, पायाभूत सुविधेत ५३.५ गुण व इतर निकषा २२ गुण असे १३९ गुण मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव भगवान दुधाटे यांनी सांगीतले.

लातूर बाजार समिती राज्यात आव्वल राहण्यासाठी प्रयत्न करू
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात काम करत असलेली लातूर बाजार समितीचे अत्यंत चांगले काम चालू आहे. बाजार समितीत अत्यंत काटकसरीने खर्च करून उत्पन्न वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळातही लातूर बाजार समिती राज्यात आव्वल येण्यासाठी प्रशासन व संचालक मंडळाच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR