35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeलातूरसत्तर गावांत राजकीय पुढा-यांना गावबंदी

सत्तर गावांत राजकीय पुढा-यांना गावबंदी

निलंगा : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणास पाठींबा देत निलंगा तालुक्यातील साधारणत:हा ७० गावात राजकीय पुढा-यांना गाव बंदी केली गेली आहे. तर आठ गावात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान निलंगा शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेऊन दि ३० ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने निर्धार करण्यात आला आहे. तालुक्यामध्ये मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला ग्रामीण भागात पाठिंबा वाढत आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी निलंगा तालुक्यातील जवळपास ७० गावात राजकिय पुढा-यांना गावबंदी घालण्यात आलेली आहे. यात शिवणी कोतल,राठोडा, उमरगा, शेडोळ, लांबोटा, लिंबाळा, जेवरी, भंगार चिेचोली, कासार शिरशी, शिरोळ, वांजरवाडा, ताजपुर, वळसांगवी, वंजारवाडा, अंबुलगा (बु), सरवडी, नणंद, मुदगड (ए), भूतमुगळी, माकणी, अंबुलगा (मेन), अनसरवाडा, मसलगा, मिरगाळी, हसोरी (बु), हलसी (ह), हरीजवळगा, हाडगा, तुपडी, शेंद, जाजनूर, सरवडी, बेंडगा, दादगी, दापका, वडगाव माळेगाव, ताजपुर, गव्हाण, सांगवी(जे),जाऊवाडी, हलगरा, बडुर व पानचिंचोली आदीसह तालुक्यातील ७० गावात राजकीय पुढा-यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर आठ गावात साखळी उपोषण सुरू आहे . यात उमरगा (हा), लिंबाळा, मुदगड ऐकोजी, कासार शिरशी, भूतमुगळी, राठोडा, हलगरा, अंबुलगा (मेन) या गावांचा समावेश आहे. दरम्यान निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. ३० ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्याचा सकल मराठा समाज निलंगा तालुक्यातील मराठा बांधवांनी निर्धार केला आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे तसेच मराठा योद्धा जरांगे पाटील मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा यासाठी गेली ४५ दिवस झाले आंदोलन उपोषण करत आहेत. सरकारने मराठा समाजाला चाळीस दिवसात आरक्षण देतो असा शब्द दिला होता पण तो शब्द मुख्यमंत्री महोदय यांनी पाळला नसल्यामुळे चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत त्यास पाठींबा म्हणून निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे. निलंगा तालुक्यातील अनेक गावात सर्वपक्षीय राजकीय पुर्ढा­यांना गाव बंदी करत साखळी उपोषण करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणास ग्रामीण भागातून पांिठबा दिवसेंदिवस वाढत आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण लढयात निलंगा तालुक्यातील तमाम मराठा बांधवांनी ताकतीने त्यांच्यापाठिशी उभे राहण्याचा आज संकल्प करण्यात आला. सकल मराठा समाज निलंगा वतीने आज शासकीय विश्रामगृह निलंगा येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे तसेच मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा यासाठी गेली ४५ दिवस झाले आंदोलन उपोषण करत आहेत.

सरकारने मराठा समाजाला चाळीस दिवसात आरक्षण देतो असा शब्द दिला होता पण तो शब्द मुख्यमंत्री महोदय यांनी पाळला नसल्यामुळे मागीलल चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत त्यास पाठींबा म्हणून निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येत असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले . यावेळी गावागावात साखळी उपोषण सुरू करणे तसेच प्रत्येक गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करणे, उपोषण स्थळी कोणत्याही सत्ताधारी असो की विरोधी पक्षातील नेत्यांनी भेट देऊ नये व कोणत्याही राजकीय पक्षांनी निलंगा तालुक्यात राजकीय कार्यक्रम आयोजित करू नये,अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे ठराव बैठकीत घेण्यात आले. यावेळी निलंगा शहरातील व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पानचींचोली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने नारायण राणे व गुण-तन् सदावर्ते यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान सावरी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने सदावर्ते यांच्या प्रतिमेस चपलांचा हार घालून गावातून धिंड काढय्यात आली.

मनोज जरांगेच्या आंदोलनास आमदार निलंगेकरांचा पाठिंबा
आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरसावले असून दुस-यांदा सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास आपला पाठिंबा असून मराठा समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. सत्तेत असलेल्या पक्षाचे आमदार असूनही आपण मराठा समाजाच्या सोबत असल्याचे दाखवून दिले आहे. आमदार निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आपला मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा असून मराठा समाज महाराष्ट्रातील मुख्य घटक आहे. मराठा समाजाचे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे.

मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती असून ९९% मराठा समाज हा अल्पभूधारक शेतकरी आहे. मराठा समाजाची परिस्थिती बिकट असल्यामुळे गरीबी मराठा कुटुंबातील मुले शैक्षणिक व नोकरीच्या सुविधेपासून गेल्या अनेक वर्षापासून वंचित आहेत. मराठा समाजाची आजची परिस्थिती लक्षात घेता या समाजाला आरक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी लोकप्रतिनिधी या नात्याने मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्या व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिबा देत आहे व मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन आमदार निलंगेकर यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR