लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-१ – नागरिकांनी मनमोकळेपणाने मांडल्या समस्या

गटार साफ, घाण उचलणार कोणे? समस्यांसह जगावं लागतय; घर सोडून तर जाता येत नाही!

लातूर : (प्रतिनिधी) गेली सात वर्षे लातूर शहर महानगरपालिकेत प्रशासक आहे़ या प्रशासकीय काळात लातूर शहरातील रस्ते, पाणी, वीज यासह इतर  प्रश्न, समस्यांची पुर्तता होत नाही, अशी जवळपास सर्वांचीच ओरड आहे़ ‘एकमत’ने जनसामान्यांचा आवाज मनपा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी स्पॉट रिपोर्टच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केला आहे़ शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांनी आपल्या व्यथा, वेदना, समस्या या व्यासपीठावर मनमोकळेपणाने मांडल्या आहेत़ प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्ते, नाल्या, कचºयाची मोठी समस्या आहे़ एका ज्येष्ठ महिलेने तर समस्यांसह जगावं लागतय, घर सोडून तर जाता येत नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली.

या ना त्या कारणाने लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लांबत गेल्या़ तब्बल सात वर्षे महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत़ प्रशासकीय राज असल्याने मनपातील उच्च पदस्थ अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मनपाचा कारभार हाकत आहेत़ त्यात जनसामान्यांचा आवाज बदला गेल्याची भावना नागरिकांची झाली आहे़ प्रभाग क्रमांक १ मध्ये व्यंकटेशनगर, बेळंबेनगर, काळीगल्ली, सूळगल्ली, नांदगाव वेस, पटेल चौक, रामगल्ली, मिस्कीनपूरा, सिद्धेश्वर वेस, लाडगल्ली, माळेगल्ली हा भाग येतो.

शहराच्या गाव भागातील प्रभाग क्रमांक १़ या प्रभागाचा बहूताश भाग स्लम एरियामध्ये मोडतो़ या प्रभागात नळाला पाणी येत़ परंतु, सुरुवातीचे पाच, दहा मिनीटे पाण्याना उग्र दर्प असतो़ त्यानंतर स्वच्छ पाणी येते़ मनपाच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी चार-आठ दिवसाला येतात़ गटारीतील कचरा काढतात़ परंतू, काढलेला कचरा चार-चार दिवस उचलत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते़ गटारीतील दुर्गंधी रस्त्यावर पडून राहाते़ सखल भाग तर आहेच पण गटारी लहान असल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यांवर कायम असते़ परिणामी या भागात सतत दलदल असते़ या मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालला आहे़ सुविधांअभावी या प्रभागातील नागरिक त्रस्त आहेत़ या प्रभागातील नाल्या साफ होतात परंतू, डोकेदुखी असते ती नालीतून काढून रस्त्यावर टाकलेली घाण उचलली जात नाही़ गाव भागातील विशेष: प्रभाग क्रमांक १ मधील गटारी लहान आहेत़ हा भाग जुना असल्यामुळे दाटीवाटीचा आहे़ रस्ते मोठे नाहीत त्यामुळेही अनेक प्रश्न आहेत़ या प्रभागात स्वच्छतेचा जसा प्रश्न आहे त्यापेक्षा मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे.

युवकांच्या हाताला काम देण्यासाठी काही करता आले तर ते निश्चितपणे करावे, असे कार्तिक मगर म्हणाले़ नगरसेवक काम करणारा असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली़ मनपाचे कर्मचारी उद्दट बोलतात, असे इसाक कुरेशी यांचे म्हणणे आहे तर एका ज्येष्ठ नागरिकाने कचरा उचलणाºया यंत्रणेचा कंत्राटदार प्रायव्हेट आहे, असे कर्मचारी सांगतात, अशी तक्रार केली़ एकंदरीत प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54

Latest news